Friday, January 10, 2020

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती

मेनोपॉज ही अशी अवस्था आहे ज्यात एखाद्या स्त्रीला सलग बारा महिने मासिक पाळी आलेली नसते. ही अवस्था सहसा 45 ते 55 वयोगटाच्या आत असलेल्या स्त्रियांमध्ये बघायला मिळते.
मेनोपॉज मध्ये बऱ्याचदा त्रासदायक लक्षणे जाणवतात जसे शरीरात अतिरिक्त उष्णता जाणवणे, व वजन वाढणे इत्यादी, पण बरेचदा यासाठी डॉक्टरांच्या उपचारांची गरज भासत नाही.

मेनोपॉज कधी सुरू होतो आणि किती काळा राहतो?
बऱ्याच स्त्रियांना शेवटच्या मासिक पाळीच्या चार वर्ष आधीपासून मेनोपॉज चे लक्षणे दिसायला सुरवात होते व ही लक्षणे मेनोपॉजच्या चार वर्षानंतर पर्यंत राहू शकतात.
काही स्त्रियांना दहा वर्षांपर्यंत मेनोपॉज ची लक्षणे दिसू शकतात. दहा टक्के स्त्रियांमध्ये ही लक्षणे त्यांच्या शेवटच्या पाळीच्या बारा वर्षानंतर ही बघायला मिळतात.
प्रीमेनोपॉज हा मेनोपॉजच्या आधी येणारा टप्पा आहे. प्रीमेनोपॉज मध्ये मेनोपॉज साठी गरजेचे असलेले बदल आपल्या शरीरातील हार्मोन् घडवून आणत असतात. प्री मेनोपॉज चा टप्पा काही महिने ते काही वर्षापर्यंत राहू शकतो, साधारणता चाळिशीतील महिलांमध्ये प्रीमेनोपॉज बघायला मिळतो. मात्र काही स्त्रियांमध्ये प्रीमेनोपॉज न येता अचानक मेनोपॉज येत असतो.

प्रीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज यातील फरक..

प्रिमेनोपॉज दरम्यान मासिक पाळी अनियमित होत असते, बऱ्याचदा महिना टाळून मासिक पाळी येत असते, यावेळी नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी अंगावरुन जाणे हेही बघायला मिळते.

मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष मासिक पाळी न येणे.

मेनोपॉज नंतरच्या काळास पोस्टमेनोपॉज असे म्हणतात.

मेनोपॉज ची लक्षणे.
प्रत्येक स्त्री मध्ये मेनोपॉज ची लक्षणे काही प्रमाणात वेगवेगळी असू शकतात. अचानक आणि कमी वेळेत आलेल्या मेनोपॉज मधील लक्षणे सहसा जास्त त्रासदायक असतात.अंडाशयासाठी त्रासदायक असलेले आजार जसे कॅन्सर गर्भपिशवी काढून घेणे धूम्रपान यांनी मेनोपॉज ची लक्षणे जास्त त्रासदायक होतात व जास्त काळासाठी सहन करावी लागतात.मासिक पाळी वगळता प्री मेनोपॉज मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज यातली इतर लक्षणे सारखे असतात

सामान्यतः प्री मेनोपॉज मध्ये बघितली जाणारी लक्षणे.
-अनियमित मासिक पाळी.
- नेहमीपेक्षा कमी किंवा अधिक प्रमाणात होणारा मासिक पाळीचा स्त्राव.

सामान्यतः मेनोपॉज दरम्यान बघितली जाणारी लक्षणे.
-75 टक्क्यांपर्यंत स्त्रियांना मेनोपॉज दरम्यान शरीरातून उष्णता निघण्याचा भास होतो.
-निद्रानाश म्हणजे झोप न येणे
- जनानांगात कोरडेपणा येणे
-वजन वाढणे
-डिप्रेशन
-अतिरिक्त चिंता
-एकाग्रता नष्ट होणे
-स्मृतीभ्रंश म्हणजे विसरभोळेपणा वाढणे
-कामेच्छा कमी होणे
-तोंड डोळे व त्वचा कोरडी पडणे
-वारंवार लघवी होणे
-दुखरे स्तन
-डोकेदुखी
-हृदयात धडधड
-मूत्रमार्गाचे इन्फेक्शन
-सांधेदुखी
-हाडे कमकुवत होणे
-स्तनांचा आकार कमी होणे
-केस गळणे किंवा कमकुवत होणे
-चेहऱ्यावर मानेवर छातीवर व पाठीवरचे केस वाढणे

मेनोपॉज का होतो?
मेनोपॉज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जी अंडाशयाचे वय वाढल्याने व त्याच्याशी संबंधित हार्मोन कमी झाल्याने होते. यामुळे शरीरात बरेच बदल होतात. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अंडाशयातील स्त्रीबीजाची निर्मिती थांबते. बऱ्याच स्त्रियांची पाळी अनियमित होऊन पुढे ढकलली जाते, पाळी दरम्यान होणारा स्राव नेहमीपेक्षा कमी किंवा अधिक प्रमाणात होतो. आणि हे सगळे चाळिशी दरम्यान होते.

काही स्त्रियांमध्ये मेनोपॉज नैसर्गिक नसतो, तो अंडाशय किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या अवयवांना झालेली दुखापत किंवा त्यांच्या झालेले ऑपरेशन मुळे होऊ शकतो.

मेनोपॉज चे निदान कसे केले जाते ?
आपल्याला होणारा त्रास मेनोपॉज आहे का हे ओळखण्याचे सगळ्यात सोपे साधन म्हणजे जर आपण चाळीशीत असाल आणि आपल्याला मेनोपॉज ची लक्षणे असतील तर आपल्या डॉक्टरला जाऊन भेटा.

PicoAMH Elisa नावाची एक नवीन टेस्ट फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ने मंजूर केली आहे जी मेनोपॉज चे निदान करते.

 रुग्णाला असलेल्या लक्षणानुसार डॉक्टर मेनोपॉज मध्ये इतरही चाचण्या सुचवू शकतात जसे की
थायरॉईड फंक्शन टेस्ट
ब्लड लिपिड प्रोफाइल
लिवर फंक्शन टेस्ट
किडनी फंक्शन टेस्ट
टेस्टेस्टेरॉन प्रोजेस्टेरोन प्रोलॅक्टीन आणि कोरिओनिक गोन्याडोट्रोपिन  (hCG)

मेनोपॉज वरील उपचार.
लक्षणे जास्त त्रासदायक असतील तरच औषधोपचाराची गरज भासते अन्यथा लक्षणे काही काळा नंतर बिना उपचाराने बरे होतात. मेनोपॉज वरील उपचार जी लक्षणे तीव्र असतील व आपल्या दैनंदिन कामकाजावर वाईट परिणाम करत असतील त्या लक्षणांना डॉक्टर औषधोपचार करतात यासोबतच जीवनशैलीतील बदल सुचवले जातात. 

जीवनशैलीत सुचवले जाणारे बदल-

१) शांत रहा व आरामदायक जीवन शैली निवडा-
ढिले व सुती कपडे वापरा, विशेषतः रात्री व वाईट हवामानात ते तुम्हाला शरीरावर होणाऱ्या उष्णतेच्या लक्षणांपासून वाचवतील.

२) व्यायाम करा व वजनावर लक्ष द्या-
रोज पोटात फक्त 400 ते 600 कॅलरीज जातील असा आहार ठेवा याने तुमचं वजन वाढणार नाही, तसेच दिवसातून वीस ते तीस मिनिटे व्यायाम करा.

३) भावना व्यक्त करा-
या काळात येणाऱ्या नकारात्मक भावनांविषयी जसे डिप्रेशन चिंता दुःख एकटेपणा निद्रानाश याविषयी आपल्या डॉक्टरांशी बोला.
यासोबतच तुमचे प्रियजन व कुटुंबीय यांना या भावनांविषयी सांगा आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांची मदत घ्या.

४) पूरक आहार घ्या-
आपल्या आहारासोबत कॅल्शियम विटामिन डी आणि मॅग्नेशियम असलेले घटक किंवा औषधी घ्या, त्या तुम्हाला हाडं ठिसूळ होण्यापासून वाचवतील आणि तुमची झोप व ताकत वाढवतील. या सप्लीमेंट विषयी तुमच्या डॉक्टरांकडून अधिक जाणून घ्या.

५) विश्रांतीचे तंत्र जाणून घ्या-
तुमच्या शरीराला सोबतच मनाला योग्य विश्रांती मिळावी यासाठी योगा मेडिटेशन व तत्सम गोष्टींना तुमच्या डेली रुटीन चा भाग बनवा.

६) तुमच्या त्वचेची काळजी घ्या-
या काळात होणाऱ्या त्वचेच्या शुष्क पणासाठी भरपूर मोश्चरायझर वापरा.

७) झोपेच्या वेळा पाळा-
योग्यवेळी पुरेशी झोप घेतल्याने बरेचशे त्रास कमी होतात त्यासाठी झोपेच्या वेळा पाळा, झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

८) व्यसने टाळा-
धूम्रपान दारू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आपला असलेला त्रास वाढवू शकते, म्हणून मेनोपॉज दरम्यान कुठलेही व्यसन करू नका.

आपण घेतलेली काळजी ही आपला आजचा त्रास व उद्याचा आजार वाचू शकते, स्वतःची काळजी घ्या व सुदृढ रहा.


  • डॉक्टर शीतलप्रभा प्रशांत महाले 
संजीवनी क्लीनिक, मुख्य रोड, मुकुंदवाडी, औरंगाबाद.
फोन- 9421366060
( परिचय- लेखिका स्वतः डॉक्टर असून गेल्या दहा वर्षापासून स्री रोगातील विविध आजारांवर त्या यशस्वीरित्या उपचार करत आहेत.)

No comments:

Post a Comment