Friday, January 31, 2020

कोरोणा व्हायरस विषयी अत्यंत महत्त्वाचे...

सध्या चीन मधून आलेल्या कोरोना व्हायरस ची चर्चा सर्वत्र रंगत असून आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या विषाणूने एकूण 25 जणांचा बळी घेतलेला आहे तर 830 जणांना अाजाराची लागण झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इतर देशांसोबतच भारत देशालाही सतर्कतेचा इशारा देत हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितलेले आहे. चीन सोबतच आता थायलंड सिंगापूर मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे,
हा धोका लक्षात घेऊन एकट्या मुंबई विमानतळावर 3997 प्रवाशांची खबरदारी म्हणून वैद्यकीय तपासणी केली गेली, त्यातून आठ संशयित रुग्ण रुग्णालयात ऍडमिट केले गेले आहेत.
 हा धोका लक्षात घेता सामान्य माणसालाही या आजाराविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी आजचा दिवस आपण कोरोना व्हायरस व त्यासंबंधी लक्षणे काय असतात हे शिकण्यासाठी घालवणार आहोत. सध्या इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या कारोना व्हायरसच्या माहितीपैकी बरीचशी माहिती चुकीची असल्याकारणाने हा खटाटोप, यात सांगितली गेलेली माहिती एका रिसर्च पेपर मधून घेण्यात आलेली आहे ज्यात 41 रुग्णांवर अभ्यास केला गेला ज्याचा खर्च चिनी शासनाच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. 24 जानेवारी 2020 रोजी हा अभ्यास thelancet.com या संकेत स्थळावर पब्लिश केला गेलाय.
2019च्या सरतेशेवटी चीनमधील वुहान शहरामध्ये न्युमोनिया ची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली.  काळजीपूर्वक केल्या गेलेल्या वैद्यकीय तपासणी अंती असे लक्षात आले की या सर्व रुग्णांना कोरोना वायरस नावाच्या विषाणूचे इन्फेक्शन झालेले आहे, मात्र यावेळी आढळून आलेल्या विषाणूची जनुकीय संरचना पूर्वी बघण्यात आलेल्या विषाणू पेक्षा वेगळी आहे, यापूर्वीही मागच्या दोन दशकांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना व्हायरस ने झालेले इन्फेक्शन बघण्यात आलेले आहे, त्यातील काही प्रकारचे कोरोना व्हायरस हे मवाळ स्वरूपातील आजारास कारणीभूत ठरतात मात्र त्यातील बीटाकोरोनाव्हायरस प्रकारातील दोन उपप्रकार अनुक्रमे 10% व 37% मृत्युस कारणीभूत ठरतात, यावेळी आढळून आलेले कोरोनाव्हायरस हे पूर्वीच्या विषाणू पेक्षा वेगळे आहे असे लक्षात येते. या वेळेच्या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये 
98 % रुग्णांना ताप 
76 % रुग्णांमध्ये खोकला 
44 % रुग्णांमध्ये अशक्तपणा व स्नायूंचे दुखणे हे आढळून आले कमी प्रमाणात असलेले लक्षणांमध्ये
 28 % रुग्णांमध्ये छातीत कफ तयार होणे 
8 % लोकांमध्ये डोकेदुखी व 
5 % लोकांच्या थुंकीतून रक्त येणे 
3%  लोकांमध्ये अतिसाराचा त्रास
लागण झालेल्या रुग्णांमध्ये लागण झाल्याच्या सरासरी आठ दिवसात 55% रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होण्याची सुरुवात झाली.
63 % रुग्णांमध्ये lymphocytopenia  ( रक्तातील पांढऱ्या पेशीतील lymphocyte प्रकाराच्या पेशी कमी होणे)
व्हायरस ची बाधा झालेल्या सर्व रुग्णांमध्ये निमोनिया सारखे लक्षण बघायला मिळाले व यातल्या 32 % रुग्णांना आयसीयूमध्ये ऍडमिट करायची गरज पडली, जातील 15 % लोकांचा आजारामुळे जीव गेला.
अजून तरी भारतात हा आजार आलेला नाही तरी आपण अशात बाधित देशांमध्ये जाऊन आला असाल, किंवा त्या देशात जाऊन आलेल्या व्यक्ती सोबत आपण राहिला असाल ज्यास वरील नमूद केलेली लक्षण आहेत तर कदाचित आपल्याला या आजाराची लागण झालेली असू शकते यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या व स्वतःला पुढे होणार्‍या त्रासापासून वाचवा. ही माहिती आपल्या प्रियजनांना, मित्रांना, मैत्रिणींना, कुटुंबाला फॉरवर्ड करा या आजाराविषयी काही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये त्या शंका विचारा, आपण निरोगी राहा व इतरांना हे वैद्यकीय ज्ञान वाटून त्यांनाही निरोगी राहण्यास मदत करा. आपणास प्रभू निरोगी आयुष्य प्रदान करो ही सदिच्छा..
- डॉ. प्रशांत महाले.


Update-
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार भारतातील या आजाराचा पहिला रुग्ण सापडला आहे , हा रुग्ण चीनमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी असून तो मूळचा केरळ राज्यातील आहे .


Friday, January 10, 2020

Weight loss व्यायाम न करता वजन कसे कमी करावे

जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुम्हाला त्याची आवश्यकता आहे का हे बघणे सर्वप्रथम महत्त्वाचे असणार आहे.
बऱ्याचदा विशेषतः तरुण मुलींमध्ये गरजेपेक्षा वजन कमी करण्याची इच्छा असते मात्र गरजेपेक्षा वजन कमी करणे हेसुद्धा आजाराच्या कक्षेत मोडते त्यामुळे असे करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे राहत नाही.



तुमचे वजन नेमके किती असावे हे तुमच्या उंचीला गुणोत्तर असते यासाठी तुमचे डॉक्टर बेसल मेटॅबोलिक इंटेक्स म्हणजे बीएमआय चा वापर करतात. यासाठी काही गणिते वापरून तुमचे वजन सरासरी किती असले पाहिजे हे शोधले जाते,
 एखाद्या सुदृढ वयात आलेल्या व्यक्तीला जर अंदाजे त्याचे वजन किती असावे हे बघायचे असेल तर सेंटीमीटर मध्ये स्वतःची उंची मोजून त्यात न 100 वजा करा जो आकडा आहे त्याच्या जवळपास तुमचे वजन असले पाहिजे, उदाहरणार्थ
जर एखाद्या तरुण मुलाची उंची १६७ सेंटीमीटर असेल तर त्याचे वजन 67 किलोच्या आसपास असले पाहिजे.



१) जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गोड खाणे टाळा
२)वजन कमी करण्यासाठी सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये काहीही खाणे टाळले पाहिजे आणि तसे करू शकत नसाल तर मधल्या काळात फक्त फळे खाल्ली पाहिजे मधल्या काळात आयुर्वेद शास्त्रानुसार तक्रपान सुद्धा केले जाऊ शकते तक्रपान म्हणजे ताक पिणे.
३) वजन कमी करत असाल तर कोल्ड्रिंक पिऊ नये अगदी एक गोड सुद्धा पिऊ नये.
४) आहारातील जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे किंवा त्या जागी कमी कॅलरी असलेल्या पदार्थांचा वापर केला पाहिजे उदाहरणार्थ 
फुल क्रीम दुधापेक्षा फॅट काढून घेतलेले दूध वापरावे,
 दही वापरण्यापेक्षा लो फॅट योगर्ट वापरावे,
५)हॉटेलमधील व तळलेले अन्न सहसा खाऊ नये, हॉटेल मधल्या जेवणापेक्षा घरचे जेवण हे सहसा कमी कॅलरीज असते, हॉटेलच्या सर्विंग या आपल्या गरजेपेक्षा बऱ्याचदा जास्त असतात आणि आपण ते पूर्ण संपवण्याच्या प्रयत्न आपल्या पोटात जास्त कॅलरीज टाकत असतो, असे न करता हॉटेलमध्ये खायची वेळ आलीच तर लागेल तेवढे खाऊन उरलेल्यांनी सोबत बांधून घेतलेले कधीही चांगले.
६) घरी स्वयंपाकासाठी सहसा अशी तेल वापरावीत ज्यात सॅच्युरेटेड फॅट कमी असतील, राइस ब्रान ऑइल ,कॅनोला ओईल, ऑलिव्ह ऑइल, यात सॅच्युरेटेड फॅट कमी प्रमाणात असतात,
एकदा तेल गरम झाले की त्यात वाढतात त्यामुळे एकदा गरम झालेले तेल पुन्हा वापरू नये. तसेच तळलेले पदार्थ हे जास्त प्रमाणात खाऊ नये.
वर सांगितलेल्या तेल प्रकारात फक्त राईस ब्रान ऑइल हीट स्टेबल ऑइल आहे.
७) जर वजन कमी करून हवा असेल तर दारू टाळा,  दारूमध्ये कुठल्याही प्रकारचे पोषक द्रव्ये (Nutrients) नसतात फक्त कॅलरीज असतात यांनी आपले वजन वाढू शकते यासोबतच दारू पिताना त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या घटकांमध्ये सहसा तळलेल्या तेलकट पदार्थांचा वापर जास्त होतो त्याने भरमसाठ प्रमाणात वजन वाढण्यास मदत होते.

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती

मेनोपॉज ही अशी अवस्था आहे ज्यात एखाद्या स्त्रीला सलग बारा महिने मासिक पाळी आलेली नसते. ही अवस्था सहसा 45 ते 55 वयोगटाच्या आत असलेल्या स्त्रियांमध्ये बघायला मिळते.
मेनोपॉज मध्ये बऱ्याचदा त्रासदायक लक्षणे जाणवतात जसे शरीरात अतिरिक्त उष्णता जाणवणे, व वजन वाढणे इत्यादी, पण बरेचदा यासाठी डॉक्टरांच्या उपचारांची गरज भासत नाही.

मेनोपॉज कधी सुरू होतो आणि किती काळा राहतो?
बऱ्याच स्त्रियांना शेवटच्या मासिक पाळीच्या चार वर्ष आधीपासून मेनोपॉज चे लक्षणे दिसायला सुरवात होते व ही लक्षणे मेनोपॉजच्या चार वर्षानंतर पर्यंत राहू शकतात.
काही स्त्रियांना दहा वर्षांपर्यंत मेनोपॉज ची लक्षणे दिसू शकतात. दहा टक्के स्त्रियांमध्ये ही लक्षणे त्यांच्या शेवटच्या पाळीच्या बारा वर्षानंतर ही बघायला मिळतात.
प्रीमेनोपॉज हा मेनोपॉजच्या आधी येणारा टप्पा आहे. प्रीमेनोपॉज मध्ये मेनोपॉज साठी गरजेचे असलेले बदल आपल्या शरीरातील हार्मोन् घडवून आणत असतात. प्री मेनोपॉज चा टप्पा काही महिने ते काही वर्षापर्यंत राहू शकतो, साधारणता चाळिशीतील महिलांमध्ये प्रीमेनोपॉज बघायला मिळतो. मात्र काही स्त्रियांमध्ये प्रीमेनोपॉज न येता अचानक मेनोपॉज येत असतो.

प्रीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्टमेनोपॉज यातील फरक..

प्रिमेनोपॉज दरम्यान मासिक पाळी अनियमित होत असते, बऱ्याचदा महिना टाळून मासिक पाळी येत असते, यावेळी नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी अंगावरुन जाणे हेही बघायला मिळते.

मेनोपॉज म्हणजे सलग एक वर्ष मासिक पाळी न येणे.

मेनोपॉज नंतरच्या काळास पोस्टमेनोपॉज असे म्हणतात.

मेनोपॉज ची लक्षणे.
प्रत्येक स्त्री मध्ये मेनोपॉज ची लक्षणे काही प्रमाणात वेगवेगळी असू शकतात. अचानक आणि कमी वेळेत आलेल्या मेनोपॉज मधील लक्षणे सहसा जास्त त्रासदायक असतात.अंडाशयासाठी त्रासदायक असलेले आजार जसे कॅन्सर गर्भपिशवी काढून घेणे धूम्रपान यांनी मेनोपॉज ची लक्षणे जास्त त्रासदायक होतात व जास्त काळासाठी सहन करावी लागतात.मासिक पाळी वगळता प्री मेनोपॉज मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज यातली इतर लक्षणे सारखे असतात

सामान्यतः प्री मेनोपॉज मध्ये बघितली जाणारी लक्षणे.
-अनियमित मासिक पाळी.
- नेहमीपेक्षा कमी किंवा अधिक प्रमाणात होणारा मासिक पाळीचा स्त्राव.

सामान्यतः मेनोपॉज दरम्यान बघितली जाणारी लक्षणे.
-75 टक्क्यांपर्यंत स्त्रियांना मेनोपॉज दरम्यान शरीरातून उष्णता निघण्याचा भास होतो.
-निद्रानाश म्हणजे झोप न येणे
- जनानांगात कोरडेपणा येणे
-वजन वाढणे
-डिप्रेशन
-अतिरिक्त चिंता
-एकाग्रता नष्ट होणे
-स्मृतीभ्रंश म्हणजे विसरभोळेपणा वाढणे
-कामेच्छा कमी होणे
-तोंड डोळे व त्वचा कोरडी पडणे
-वारंवार लघवी होणे
-दुखरे स्तन
-डोकेदुखी
-हृदयात धडधड
-मूत्रमार्गाचे इन्फेक्शन
-सांधेदुखी
-हाडे कमकुवत होणे
-स्तनांचा आकार कमी होणे
-केस गळणे किंवा कमकुवत होणे
-चेहऱ्यावर मानेवर छातीवर व पाठीवरचे केस वाढणे

मेनोपॉज का होतो?
मेनोपॉज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे जी अंडाशयाचे वय वाढल्याने व त्याच्याशी संबंधित हार्मोन कमी झाल्याने होते. यामुळे शरीरात बरेच बदल होतात. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अंडाशयातील स्त्रीबीजाची निर्मिती थांबते. बऱ्याच स्त्रियांची पाळी अनियमित होऊन पुढे ढकलली जाते, पाळी दरम्यान होणारा स्राव नेहमीपेक्षा कमी किंवा अधिक प्रमाणात होतो. आणि हे सगळे चाळिशी दरम्यान होते.

काही स्त्रियांमध्ये मेनोपॉज नैसर्गिक नसतो, तो अंडाशय किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या अवयवांना झालेली दुखापत किंवा त्यांच्या झालेले ऑपरेशन मुळे होऊ शकतो.

मेनोपॉज चे निदान कसे केले जाते ?
आपल्याला होणारा त्रास मेनोपॉज आहे का हे ओळखण्याचे सगळ्यात सोपे साधन म्हणजे जर आपण चाळीशीत असाल आणि आपल्याला मेनोपॉज ची लक्षणे असतील तर आपल्या डॉक्टरला जाऊन भेटा.

PicoAMH Elisa नावाची एक नवीन टेस्ट फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ने मंजूर केली आहे जी मेनोपॉज चे निदान करते.

 रुग्णाला असलेल्या लक्षणानुसार डॉक्टर मेनोपॉज मध्ये इतरही चाचण्या सुचवू शकतात जसे की
थायरॉईड फंक्शन टेस्ट
ब्लड लिपिड प्रोफाइल
लिवर फंक्शन टेस्ट
किडनी फंक्शन टेस्ट
टेस्टेस्टेरॉन प्रोजेस्टेरोन प्रोलॅक्टीन आणि कोरिओनिक गोन्याडोट्रोपिन  (hCG)

मेनोपॉज वरील उपचार.
लक्षणे जास्त त्रासदायक असतील तरच औषधोपचाराची गरज भासते अन्यथा लक्षणे काही काळा नंतर बिना उपचाराने बरे होतात. मेनोपॉज वरील उपचार जी लक्षणे तीव्र असतील व आपल्या दैनंदिन कामकाजावर वाईट परिणाम करत असतील त्या लक्षणांना डॉक्टर औषधोपचार करतात यासोबतच जीवनशैलीतील बदल सुचवले जातात. 

जीवनशैलीत सुचवले जाणारे बदल-

१) शांत रहा व आरामदायक जीवन शैली निवडा-
ढिले व सुती कपडे वापरा, विशेषतः रात्री व वाईट हवामानात ते तुम्हाला शरीरावर होणाऱ्या उष्णतेच्या लक्षणांपासून वाचवतील.

२) व्यायाम करा व वजनावर लक्ष द्या-
रोज पोटात फक्त 400 ते 600 कॅलरीज जातील असा आहार ठेवा याने तुमचं वजन वाढणार नाही, तसेच दिवसातून वीस ते तीस मिनिटे व्यायाम करा.

३) भावना व्यक्त करा-
या काळात येणाऱ्या नकारात्मक भावनांविषयी जसे डिप्रेशन चिंता दुःख एकटेपणा निद्रानाश याविषयी आपल्या डॉक्टरांशी बोला.
यासोबतच तुमचे प्रियजन व कुटुंबीय यांना या भावनांविषयी सांगा आणि त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांची मदत घ्या.

४) पूरक आहार घ्या-
आपल्या आहारासोबत कॅल्शियम विटामिन डी आणि मॅग्नेशियम असलेले घटक किंवा औषधी घ्या, त्या तुम्हाला हाडं ठिसूळ होण्यापासून वाचवतील आणि तुमची झोप व ताकत वाढवतील. या सप्लीमेंट विषयी तुमच्या डॉक्टरांकडून अधिक जाणून घ्या.

५) विश्रांतीचे तंत्र जाणून घ्या-
तुमच्या शरीराला सोबतच मनाला योग्य विश्रांती मिळावी यासाठी योगा मेडिटेशन व तत्सम गोष्टींना तुमच्या डेली रुटीन चा भाग बनवा.

६) तुमच्या त्वचेची काळजी घ्या-
या काळात होणाऱ्या त्वचेच्या शुष्क पणासाठी भरपूर मोश्चरायझर वापरा.

७) झोपेच्या वेळा पाळा-
योग्यवेळी पुरेशी झोप घेतल्याने बरेचशे त्रास कमी होतात त्यासाठी झोपेच्या वेळा पाळा, झोप येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

८) व्यसने टाळा-
धूम्रपान दारू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आपला असलेला त्रास वाढवू शकते, म्हणून मेनोपॉज दरम्यान कुठलेही व्यसन करू नका.

आपण घेतलेली काळजी ही आपला आजचा त्रास व उद्याचा आजार वाचू शकते, स्वतःची काळजी घ्या व सुदृढ रहा.


  • डॉक्टर शीतलप्रभा प्रशांत महाले 
संजीवनी क्लीनिक, मुख्य रोड, मुकुंदवाडी, औरंगाबाद.
फोन- 9421366060
( परिचय- लेखिका स्वतः डॉक्टर असून गेल्या दहा वर्षापासून स्री रोगातील विविध आजारांवर त्या यशस्वीरित्या उपचार करत आहेत.)