Saturday, March 9, 2013

मुळ व्याध

                *   मुळ व्याध *




तसे पहायला गेले तर 'मूळव्याध 'हा अगदी घरोघरी सापडणारा विकार आहे. 
त्यातल्या त्यात गर्भारपणात जर बद्धकोष्ठतेचा त्रास झाला असेल तर स्त्रियांमध्ये हा विकार सुरु होतो. 
बद्धकोष्ठता किंवा मलावरोध आणि त्यामुळे येणारी कुंथण्याची सवय म्हणजे मुळव्याधीला आमंत्रणच. 

गुद्द्वाराजागी क्वचितप्रसंगी हाताला लागणारे छोटेसे कोंब किंवा मोड जाणवले कि मुळव्याध झाल्याची जाणीव होती.
याला बहिर्मुळव्याध म्हणता येईल.
पण प्रत्येक वेळी बाहेरून कोंब दिसेल किंवा हाताला लागेलच असे नाही.
अंतर्गत राहिलेल्या मुळव्याधीही कमालीच्या रक्तस्त्रावास जन्म देऊ शकतात.
रक्तस्राव हे असे लक्षण आहे कि जे लक्षात आले कि थोडीशी भीती वाटते.
मुळव्याधीच्या आतमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या किंवा मुळव्याधीला जोडून जखम किंवा फिशर तयार झाली कि मात्र वेदना होते.
एरवी मुळव्याध हि पूर्णपणे वेदना रहित असते.
फिशर मुळे येणारी वेदना हि इतकी तीव्र स्वरूपाची असते कि माणूस.शौचाला जायलाच घाबरायला लागतो.
त्यामुळे जेवण सोडतो.
जसे कि जेवले नाही कि जायची गरज कमी पडत जावी.
पण हे म्हणजे जे करायला पाहिजे त्याच्या नेमके उलटे.
पोटात पाणी कमी गेले, तंतुमय पदार्थ कमी गेले कि होणारी पुढची संडास हि अधिकाधिक कडक होत जाते.
आणि पुन्हा त्यामुळे अधिकाधिक वेदनेस जन्म दिला जातो.
माणूस एका दुष्ट चक्रात अडकल्यासारखे होते.
खरे तर अक्यूट फिशरमुळे येणारी वेदना हि चुटकीसरशी दुरुस्त करता येते.
पण ऑपरेशन या शब्दाबद्दलची कमालीची भीती मनात असल्यामुळे नेमके उपाय न करता....टाळाटाळ होत राहते.
वेदना सहन करावी लागते हा भाग वेगळाच पण त्या जखमेपासून इन्फेक्शन आत सालात गेले तर पेरिएनाल अब्सेस किंवा बेंड या गोष्टीला जन्म दिला जातो.
मग होणारी ठसठस आणि मग ते बेंड फुटेपर्यंत अंगावर काढायची आपली जीवनशैली.
आणि मग ते अर्धवट फुटल्यावर त्यास वर-वरूनच केलेली मलमपट्टी एका वेगळ्याच दुष्ट चक्राला जन्म देते. ..
काही दिवस पू गळणे मग पुन्हा तो पडायचे थांबणे.
आणि आत साठल्यावर पुन्हा ते अर्धवट बंद झालेले तोंड उघडणे....पुन्हा तो गळणे.

अवघड जागेचे दुखणे तपासून घेण्याबद्दल असलेली मनातील शरम ,
ऑपरेशन या शब्दाची भीती
आणि थोडेसे जरी बरे वाटले तरी मग शेष आजाराकडे पूर्ण दुर्लक्ष करायची मनोवृत्ती यामुळे आजार सलत जातो.
खरे तर पाइल्स किंवा मुळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या आतल्या व्हेनुल्स ज्या एरवी लक्षातही येत नाही पण
पण कुन्थान्याच्या सवयीमुळे त्यांच्यात रक्त साठून साठून फुगातात आणि हाताला एखाद्या कोन्बाच्या स्वरूपात लागतात.
फिशर ज्या जवळ उद्भवणारे कोंब हे सेन्तीणाल पाईल या नावाने ओळखले जाते.
आणि जखमेचे रक्षण करीत असल्यासारखी ती तिथे उभी असते.
अशी ती पाईल कापून काढण्याची गरज नसते.
खरे तर बहुतांशी पाइल्स ना ओपरेशनची गरजच नसते.
पण कुंथण्याची सवय चालू राहिली तर मात्र त्या अधिकाधिक मोठ्या होत जातात.
त्यांच्यावरचे मौ आवरण ओरखडले गेले कि रक्तस्त्राव होतो.
तो कधी थेंब थेंब होतो तर कधी एखादी पिचकारी उडवल्यासाराखाही होऊ शकतो.

बराच काला मद्यसेवन केल्यामुळे यकृता मध्ये सी-होसीस सारखा आजार उत्पन्न झाला असेल तरी प्रेशर उलटे आल्यामुळे त्या रुग्णास मुळव्याधीच्या आजारासहि तोंड द्यावे लागते.
सगळ्याच मुळव्याधी मध्ये वेदना व्हावी असे नाही.
ब-याचशा अंतर्गत मुळव्याधी या खरेतर वेदना विरहीतच असतात.

पण रक्तस्त्रावामुळे मात्र भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते.
आणि तसे ते योग्यच आहे कारण याकडे दुर्लक्ष केले तर कमालीचा अनिमिया किंवा रक्तक्षय होतो आणि त्याचा सर्व शरीरावरच परिणाम दिसून येतो.
काम करताना लवकर थकवा येणे.
निरुत्साह वाटणे.
अशी लक्षणे दिसायला लागतात.
पाइल्स मुले अगदी १.५ ते २ ग्राम हिमोग्लोबिन इतके रक्त कमी झालेले पेशंट वरचेवर पहायला मिळतात.
पंधुराका पडलेला पेशंट पाहिला कि मला पहिला संशय मुलाव्याधीचाच येतो.
तसे पहायला गेले तर मुलाव्याधीचे निदान करणे हे फार अवघड काम नाही .
सर्जन ने केलेल्या एका सोपाश्या तीस सेकंदाच्या तपासणीमध्येही मुळव्याध आहे किंवा नाही याचे निदान चटकन होऊ शकते .

प्रोक्तोस्कोपी, किंवा सिग्मोईडोस्कोपीने तर हे दिसतेच पण त्या शिवाय इतर काही विकार नाहीत ना ...
जसे कि मलाशयाचा कैन्सर किंवा अल्सरेटिव्ह कोलाय्तीस अशासारखा विकार नाही ना हे शोधून काढता येते.

एखाद्या रुग्णास पाइल्स आहेत म्हणजे त्यास हे इतर आजार होताच नाहीत असे छातीठोक पाने सांगायचे झाले तर
ज्या रुग्णास शौचावाटे रक्तस्त्राव होतो त्याची सिग्मोईडोस्कोपी वा कालोनोस्कोपी करणे आवश्यक आहे.
मलाशयाचा कैन्सर किंवा अल्सरेटिव्ह कोलाय्तीस हे अधिक गंभीर आजार आहेत आणि जेवढे लवकर त्यांचे निदान होईल तेव्हढे उत्तम.
तेवढ्या लवकर त्यांचा उपचार सुरु होतो.

वर सांगितल्याप्रमाणे फार कमी रुग्णांना पाइल्स साठी ओपरेशनाची गरज लागते.
आरोग्यपूर्ण जीवनशैली,
चांगल्या सवयी,
थोडीशी औषधे आणि क्वचित प्रसंगी विना ओपरेशन ने बरे करण्याचे मार्ग.

एखाद्या रुग्णास कोणत्या उपचार पद्धतीची गरज आहे हे प्रत्यक्ष तपासणी नंतर आरामात ठरवता येते.

आणि कोणतीही उपचार पद्धती निवडली तरी आहारामध्ये हिरव्या पालेभाजांचा समावेश,
तंतुमय पदार्थांचा समावेश
वेळोवेळी भरपूर पाणी पिणे याला पर्याय नाही .
बद्धकोष्ठता होऊ ना देणे.
होत असेल त्यावर त्वरित उपचार करून घेणे.
कुण्थणे किंवा शौचास जोर लावायचे टाळणे याला पर्याय नाही...
त्यामुळे त्या ठिकाणच्या शिरा फुगाण्याचा प्रश्नच येत नाही आणि पुढच्या सगळ्याच अडचणी टळल्या.
थोडक्यात काय आपले आरोग्य आपल्याच हातात.
आणि समजा चुकून माकून असे काही झालेच तर कोणत्या तरी अनामिक भीतीने आजार अंगावर काढणे हेही गैरच.

No comments:

Post a Comment